VIDEO : ... तर आदित्यला बर्फाच्या लादीवर झोपवून मारा, रामदास कदमांचा पलटवार
सत्ता आल्यावर दिशा सालियानचे प्रकरण बाहेर काढा, आदित्य त्यात दोषी आढळल्यास त्याला बर्फाच्या लादीवर झोपवा आणि नको त्या गादीवर फटके द्या, अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. दापोलीच्या सभेत आदित्य ठाकरे आपलं सरकार येतंय बर्फाच्या लादीवर झोपावण्याची जबाबदारी माझी असेल असं म्हणाले होते. त्यावर आता रामदास कदम यांनी देखील जशास तसं उत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी रामदास कदमांवर जहरी टीका केली होती. मी लहानपणापासून अनेकांना काका म्हणत होतो. आपलं सरकार येतंय, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारीही माझी असेल, असा इशारा आदित्य यांनी त्यावेळी दिला होता. रामदास कदम यांनी या टीकेवर आता प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचबरोबर फडणवीस यांनी ठाकरेंना अनेक वेळा फोन करून भेटण्याची विनंती केली होती. त्यावेळी ते अमित शहा आणि फडणवीस यांना भेटले असते तर आज मुख्यमंत्री राहिले असते, असा दावा देखील आपल्या भाषणातून कदम यांनी केला आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.