मुंडे हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच्या अडचणी वाढणार, धक्कादायक माहिती समोर|VIDEO

Mahadev Munde Murder Case Latest SIT Update: बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे. एसआयटीसमोर साक्षीदारांनी दिलेल्या जबाबांमुळे वाल्मीक कराड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता.

योगेश काशीद, साम टीव्ही

बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू असून प्रमुख आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) काम करत आहे. या प्रकरणात अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यामध्ये विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचे जवळपास तीन वेळा जबाब नोंदवण्यात आले. ऑक्टोबर, जुलै आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांत त्यांनी एसआयटीसमोर तसेच कॅमेऱ्यासमोर जबाब दिला आहे. या जबाबांमध्ये त्याने वाल्मीक कराडच्या मुलाचे नाव अनेकदा घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे वाल्मीक कराडच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, महादेव मुंडे हत्या प्रकरणाचे धागेदोरे आता वाल्मीक कराडच्या मुलापर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com