Special Report | लोकसभेची निवडणूक, फडणवीसांची परीक्षा?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठी अग्निपरीक्षा आहे, ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. युती-आघाड्यांपासून ते उमेदवार ठरवण्यापर्यंत राज्यातल्या भाजपचं नेतृत्व हे फडणवीसांकडे होतं.

Devendra Fadanvis News | महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठी अग्निपरीक्षा आहे, ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. युती-आघाड्यांपासून ते उमेदवार ठरवण्यापर्यंत राज्यातल्या भाजपचं नेतृत्व हे फडणवीसांकडे होतं. त्यामुळे लोकसभेच्या यश-अपयशावर फडणवीसांच्या पुढच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होणार आहे.लोकसभा निवडणुकीत मोदी-शाहांना किती यश मिळणार याकडे देशाचं लक्ष लागलं असलं तरी महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही अग्निपरीक्षा आहे. कारण भाजपला लोकसभेत बळकट करण्यासाठी त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून केंद्राच्या मदतीनं सर्व डावपेच वापरत अभ्यास सुरू केला होता. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेली उभी फूट हा त्याचाच भाग होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com