अंधारात फोनवर बोलत होता, अचानक बिबट्याचा हल्ला झाला अन्...; पाहा व्हिडिओ

Leopard Attack On Teen Near Narayangaon: नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत मोबाईलवर बोलत असलेल्या १८ वर्षीय तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला केला. तनिष परदेशी गंभीर जखमी झाला असून उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर आहे.

नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटीजवळ बिबट्याने एका तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. तनिष परदेशी (वय १८) हा तरुण गंभीर जखमी झाला असून नशिबाच्या जोरावर त्याचा जीव वाचला आहे.

हि घटना रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. मोबाईलवर बोलत रस्त्यालगत उभा असलेल्या तनिषवर अचानक बिबट्याने झडप घातली. या हल्ल्यात त्याच्या पायाच्या पोटरीवर नखांनी खोल ओरखडे पडले.

स्थानिकांनी तत्काळ धाव घेत जखमी तरुणाला नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अजून ही प्रशासनाकडून बिबट्याच्या वाढत्या दहशीतवर अजूनही काठोर पावलं उचलली जात नाहीये. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com