Laxman Hake vs Manoj Jarange : जरांगे नावाचा माणूस इतिहासजमा; लक्ष्मण हाकेंचं पुन्हा टीकास्त्र

Laxman Hake vs Manoj Jarange Patil : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर तोफ डागली आहे. मनोज जरांगे नावाचा माणूस इतिहासजमा झालेला असेल, असे ते म्हणाले.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. जरांगे नावाचा माणूस इतिहासजमा झाल्याची टीकाही त्यांनी केली.

रोहित पवार, राजेश टोपे, तानाजी सावंत, मोनिका राजळे हे आमच्या हिटलिस्टवर असून, त्यांना आम्ही पाडणारच, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

जरांगे यांनी एमएमडी फॉर्म्युला आणला आहे. जरांगे काय मालक समजतात का या लोकांना, असा सवालही हाके यांनी केला. कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं या याद्या तयार झाल्या आहेत. पत्रकार परिषद घेऊन ४ तारखेनंतर जाहीर करू. जरांगे यांची उमेदवार यादी जाहीर झाली की आमचीही ओबीसी आघाडीची यादी लगेच जाहीर करू, असं हाके यांनी सांगितलं.

जरांगे यांनी एमएमडी फॉर्म्युला आणला आहे. त्यांच्या या फॉर्म्युलाचं काही खरं नाही. ४ तारखेनंतर ते एखाद्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होऊन सलाइन घेताना दिसतील. त्यांच्या यादीचं मला तरी काही खरं वाटत नाही, असा टोलाही हाके यांनी लगावला. जरांगे यांच्या सर्व कवी कल्पना आहेत. निवडणुका होतील. जरांगे नावाचा माणूस इतिहासजमा झालेला असेल. आमची यादी तयार आहे. जरांगे पाटील यांच्या यादीची वाट बघतोय, असेही हाके म्हणाले.

वेळप्रसंगी आम्ही महायुतीच्या उमेदवारांनाही राजकीय पाठिंबा जाहीर करू; पण अट एकच असेल, त्यांनी ओबीसी आरक्षण संरक्षणाची हमी द्यावी. त्यासाठी पाहिजे तर आम्हीही स्टॅम्पपेपरवर लिहून मागू, असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com