Latur Rain News: लातूरमध्ये मुसळधार पावसाने घरणी नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून!

Latur Rain News Today: शिरुर अनंतपाळ या तालुक्यात सुद्धा मुसळधार पावसाला सुरूवात झालीये. या पावसामुळे घरणी नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला आहे.

सांगलीसह लातूर जिल्ह्यातील रात्रभर संततधार पावसाला सुरूवात झालीये. लातूरच्या काही भागात तुफान पाऊस झालाय. शिरुर अनंतपाळ या तालुक्यात सुद्धा मुसळधार पावसाला सुरूवात झालीये. या पावसामुळे घरणी नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला आहे.लातूर जिल्ह्यातील रेणा मध्यम प्रकल्पात गेल्या 4 दिवसापासून झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याचा येवा सुरू झाला आहे.. काल संध्याकाळपर्यंत धरण साठ्यात 2% टक्के पाणीसाठा वाढला आहे.. तर रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे आणखीनही पाणीसाठ्यात वाढ होत आहे... पाणीपातळी आणखीन मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.. त्यामुळे या धरण परिसरातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जातो आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com