भरत मोहळकर, साम प्रतिनिधी
महायुतीला प्रचंड मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निकषाबाहेरील नावं वगळण्याचे संकेत दिलेत.. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा सहावा हप्ता खात्यावर येणार की नाही? यावरून लाडक्या बहीणींमध्ये संभ्रम निर्माण झालाय.. त्यामुळे या योजनेत तुमचं नाव आहे की नाही? हे तपासायला हवं. ते कसं चेक करायचं? पाहूयात.
स्टेप १
तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत अॅप उघडा आणि लॉगिन करा
स्टेप २
डॅशबोर्डवर लाभार्थी अर्जदारांची यादी या बटणावर क्लिक करा
स्टेप ३
त्यात आपलं गाव, ब्लॉक, तालुका आणि जिल्हा निवडून शोधा बटणावर क्लिक करा
स्टेप ४
त्यानंतर यादीत तुमचं नाव आहे की नाही ते दिसेल
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्यासाठी सरकारने तब्बल 4500 कोटींची तरतूद केली... तर आता पुन्हा हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यातून लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींना मंजूरी देण्यात आलीय.. त्यामुळे डिसेंबरचा हप्ता मिळण्यापुर्वी लाडक्या बहीणींनी आपलं नाव यादीत आहे की नाही? याची खात्री करून घ्यायला हवी. अन्यथा पश्चाताप करण्याशिवाय कोणताच पर्याय हाती राहणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.