Kolhapur Jyotiba Temple: कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरात राडा, १५ ते २० पुजाऱ्यांची भाविकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण; VIDEO व्हायरल

Kolhapur Jyotiba Temple Fight Viral Video: कोल्हापूरातील ज्योतिबा मंदिरात एक धक्कादायक घटना घडली आहे. १५ ते २० पुजाऱ्यांनी मिळून दोन भाविकांना मारहाण केली आहे.

कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरात रोज हजारो भक्त दर्शन घेण्यासाठी जातात. याच ज्योतिबा मंदिरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. १५ ते २० पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना मारहाण केली आहे. भाविकांना लाथा-बुक्क्यांनी मारले आहे. दोन भाविकांच्या अंगावर अक्षरशः तुटून पडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये पुजारी भाविकांना मारताना दिसत आहे. या भाविकांना मारहाण नेमकी कशाबद्दल केली जाते हे अद्याप स्पष्ट आहे. मात्र, यासंदर्भात नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं गरजेचं आहे. दोन ते तीन पुजाऱ्यांकडून भाविकांच्या डोक्यात नारळ सुद्धा मारल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे. मंदिरात गेल्यावर पुजाऱ्यांकडूनच मारहाण होणे हे अत्यंत संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया सध्या समोर येत आहेत. त्यामुळे पुजाऱ्यांवर कारवाई करावी, असे भाविकांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com