ऐनवेळी प्रभाग बदलला आणि अखेरच्या क्षणी ठाकरेंच्या माजी महापौराचा दणदणीत विजय|VIDEO

Kishori Pednekar Ward Change Election Victory Mumbai: मुंबईतील प्रभाग क्रमांक 199 मधून ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवला. ऐनवेळी प्रभाग बदलून लढवलेली ही निवडणूक ठाकरे गटासाठी मोठा राजकीय दिलासा ठरली आहे.

मुंबईतील प्रभाग क्रमांक 199 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठ्या मताधिक्यांनी निवडून आलेल्या आहे. त्यांनी आपला प्रभाग बदलून निवडणूक लढवली होती आणि हा विजय ठाकरे गटासाठी मोठा मानला जात आहे. मतमोजणीच्या सुरुवातीलाच त्यांचे नाव विजयी उमेदवारांच्या यादीत आले.

उमेदवरांची यादी जाहीर झाल्यानंतर किशोरी पेडणेकर यांचे नाव पहिल्या यादीत नसल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यावेळी त्यांनी थेट मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. अखेर त्यांचे नाव जाहीर झाले. मात्र यंदा निकालामध्ये देखील त्यांच्या आकडेवारी समोर येत नसल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली होती. अखेर काहीवेळा पूर्वी त्यांना विजयी घोषित केले. यानंतर ठाकरे गटात मोठा जल्लोष पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com