नारायण राणेंनंतर आता किरण सामंत यांनीही घेतले चार अर्ज! तळकोकणामध्ये महायुतीत तणाव?

Kiran Samant Today News | रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी हालचालींना मोठा वेग आलाय. या लोकसभा मतदार संघातून अद्यापही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाहीये. त्यामुळे ठाकरेंच्या विरोधात महायुतीचा कोणत्या उमेदवार मैदानात उतरणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चार अर्ज घेतले आहेत. त्यानंतर किरण सामंत यांनीही अर्ज घेतल्यामुळे तळ कोकणातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

मुंबई : किरण सामंत यांनीही आता लोकसभेसाठी चार अर्ज घेतल्याची माहिती समोर आलीय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधला महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. किरण सामंत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी चार अर्ज घेतले असल्याचं समोर आलं आहे. याआधी नारायण राणे यांनीही चार अर्ज घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. किरण सामंत यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू आहेत. ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आता नेमकी महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळते, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. दरम्यान, नारायण राणेंनी एकीकडे प्रचारालाही सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे किरण सामंत याहीही उमेदवारी अर्ज घेतल्यानं तळकोकणातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com