Video: आम्ही लाडकी बहीण सुरक्षित योजना सुरू करणार - जितेंद्र आव्हाड

जनतेला देखील भावना असतात जनतेला सगळं समजतं की शाळा कोणाची कोणत्या पक्षाची आहे हे जनतेला माहिती आहे.

Jitendra Awhad: आंदोलन उत्स्फूर्तपणाने उभे राहिलेला आहे. पोलिसांची निष्क्रियता शाळेची लपवालपवी विरोधातील आंदोलन होतं. तीन महिन्याच्या गर्भावती महिलेला पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं. तक्रार घेतली नाही त्या विरोधात बदलापूरच्या सुशिक्षित जनतेने केलेला हे आंदोलन होतं. त्या आंदोलकांचा अपमान आहे त्यांच्या भावनांचा अपमान आहे. प्रत्येक आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित असतं असा विचार कधीही करू नये. जनतेला देखील भावना असतात जनतेला सगळं समजतं की शाळा कोणाची कोणत्या पक्षाची आहे हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे तक्रार घ्यायला उशीर झाला हे देखील जनतेला माहिती आहे. मुख्यमंत्री काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही ती घटना आणि जनतेच्या मनात उसळलेल्या भावना महत्त्वाच्या आहेत असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com