Kiran Shikhare: 'पार्टी कार्यालयात नेऊन माझ्यावर दबाव टाकला..' अजित पवार गटावर किरण शिखरेंचा सनसनाटी आरोप!

NCP Crisis News: जितेंद्र आव्हाडांसोबत किरण शिखरे यांची पत्रकार परिषद, अजित पवार गटावर शिखरेंचे गंभीर आरोप, पक्षप्रवेशाच्या वृत्तावरही मोठं स्पष्टीकरण

अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना किरण शिखरे यांचा जबरदस्ती प्रवेश करुन घेण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सकाळी स्वतः येऊन किरण शिक्रे यांनी याबाबत खुलासा केल्याचं आव्हाडांनी म्हटलंय. धीरज शर्मा आणि सोनिया दुहान हे माझे जवळचे सहकारी होते, त्यांना थांबवता आलं तर थांबवा, यासाठी मी प्रयत्न केले, असं शिखरे यांनी म्हटलंय. माझ्यावर दबाव टाकू नका, असं मी त्यांना सांगितलं, पण माझं ऐकलं गेलं नाही. मला पार्टी कार्यालयात नेऊन माझ्यावर दबाव टाकून पक्ष प्रवेश करण्यासाठी जबरदस्ती केली होती. पण मी कोणत्याही आमीषाला बळी पडलो नाही. मी पक्षप्रवेश केला नाही, असंही किरण शिखरे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आपण शरद पवारांसोबत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com