VIDEO: Dapoli मधील जामगे देवाचा डोंगर रस्ता खचला, रस्ता वाहतुकीसाठी बंद

Dapoli Landslide News: दापोली जामगे देवाचा डोंगर रस्ता खचला ,रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे

रत्नागिरी: जिल्ह्यातील दापोली जामगे देवाचा डोंगर रस्ता खचला. दरडीचा भाग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आला आहे. जामगे देवाचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात कालपासून कोसळणाऱ्या पावसामुळे डोंगराचा भाग खचून रस्त्यावर आला. ठिकठिकाणी रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वस्तीकडे जाणाऱ्या ह्या मार्गावर दरड कोसळल्याने लोकांच्या प्रवासात मोठी अडचण निर्माण झाली आहे. पावसाच्या हंगाम सुरु झाला की दरडी कोसळण्याचे प्रमाण हे वाढत चालले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com