जयंत पाटील हे महायुतीत जाणार? शिंदेंच्या शिवसेनेचे नेते नेमके काय म्हणाले? VIDEO

Sanjay Shirsat on Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशा विनंतीचं पत्र जयंत पाटील यांनी दिल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर आता शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात त्यांच्याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यापूर्वी ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती. पण आज ते वेगळ्याच कारणांनी चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यातच त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असं थेट व्यासपीठावरून सांगितलं. त्यानंतर कार्यकर्ते आणि समर्थकांनी भावुक होत घोषणाबाजी केली. त्यावेळी स्वतः जयंत पाटील देखील भावुक झाले होते.

त्यावर शरद पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांच्याबाबत निर्णय घेताना पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांसोबत बोलून निर्णय घेऊ, असं पवार म्हणाले आहेत. दुसरीकडे मात्र, ते महायुतीत जाण्याच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनीही यावर मत व्यक्त केलं आहे. मी पूर्वीपासून सांगतो की जयंत पाटील तिथे समाधानी नाहीत. अस्वस्थ आहेत. कधी काय करतील याचा नेम नाही. जास्त काळ ते राहणार नाहीत. पक्षातील काही लोक त्यांच्या विरोधात भूमिका घेताहेत. त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांनी तशी घोषणा केली असेल, असं शिरसाट म्हणाले. मात्र, महायुतीत जाण्याबाबतच्या चर्चेवर कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com