Iran: टेन्शन संपलं नाही! 'शस्त्रसंधी म्हणजे युद्धाचा अंत नाही', युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणची भूमिका

Iran-America War: इराण-अमेरिकेमध्ये १५ दिवसांचा युद्धबंदीचा करार झाला असला तरी देखील इराण शांत झाला नाही. युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणने आपली भूमिका स्पष्ट केली. 'शस्त्रसंधी म्हणजे युद्धाचा अंत नाही', असे इराणने सांगितले.

अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाचा करार झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली. एकीकडे युद्धविरामाची घोषणा जरी झाली असली तरी दुसरीकडे मात्र इराणच्या सुरक्षा परिषदेनं मोठं वक्तव्य केलं आहे. 'शस्त्रसंधी म्हणजे युद्धाचा अंत नाही. आमचं सैन्य अजूनही सज्ज आहे.', अशी भूमिका इराणनं स्पष्ट केली आहे. तर होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सागरी वाहतूक कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहील या अटीवरच युद्धविराम मान्य केल्याचे अमेरिकेने सांगितले.

इराण आणि अमेरिकेमधील युद्ध थांबल्यानंतर अनेक देशांना दिलासा मिळाला. कारण या युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसला. या युद्धामुळे महागाई वाढली, इंधनाच तुटवडा निर्माण झाल्यामुळे गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. आता युद्ध थांबल्यामुळे इंधनाचा प्रश्न सुटणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com