India's Got Latent in Trouble : 'इंडियाज गॉट लेटेंट' अडकित्त्यात अडकला! 30-40 जणांवर गुन्हा, VIDEO

YouTuber Ranveer Allahbadia’s Controversial Remarks : रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त टिप्पणीनंतर महाराष्ट्र सायबर सेलनं गंभीर दखल घेऊन India's Got Latent सह ३०-४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

इंडियाज गॉट लेटेंटच्या एका भागात युट्यूबर रणवीर अलाहबादियानं वादग्रस्त आणि अश्लिल टिप्पणी केल्यानंतर मोठा वाद उफाळला आहे. हा शो आता पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडला असून आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या शो विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंडियाज गॉट लेटेंटचा वादग्रस्त एपिसोड याआधीच युट्यूबवरून हटवण्यात आला आहे. याबाबत केंद्र सरकारनं निर्देश दिले होते. आता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून युट्यूबवरून या शोचे सर्व एपिसोड हटवण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने समय रैना, इंडियाज गॉट लेटेंट शोचे निर्माते बलराज घई आणि अन्य ३० ते ४० जणांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. शोच्या पहिल्या एपिसोडपासून ते सहाव्या एपिसोडपर्यंतचे सर्व होस्ट आणि पाहुण्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

या सर्व एपिसोडमध्ये सहभागी झालेल्या सर्वांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एकूण ३० ते ४० जणांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच सर्वांना नोटीस पाठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात येणार आहे, असेही सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com