Video: मंत्रिमंडळ बैठकीत 'या' 5 महत्त्वाच्या घोषणा; कोणत्या?

State Cabinet Meeting Big 5 Decision News: आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्त्वाचे निर्णय सरकारकडून घेण्यात आले आहेत. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. 88,575 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नागपूर,वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ,बुलढाणा या सहा जिल्ह्यातील 15 तालुक्यात 3 लाख 71 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. तसेच प्रकल्पबाधितांना सदनिका मिळणार आहेत. विना परवानगी झाड तोडल्यास आता 50 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. 9 ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com