Video: धक्कादायक; राज्य सरकारकडून लहान मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात सापडले किडे

Panvel Nutritional Food News: पनवेलच्या हरिग्राम गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.राज्य सरकारकडून लहान मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात किडे सापडले आहेत. पुन्हा एकदा लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पनवेलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 3 वर्षापर्यंतच्या मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात किडे सापडले आहेत.त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. याआधी देखील अनेक जिल्ह्यात अशाच पोषण आहारात आळया सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पोषण आहारात किडे आढळल्याने पनवेलच्या पंचायत समितीमधील महिला एवं बालविकास कार्यालयात तक्रार देखील करण्यात आली आहे. दरम्यान किडे लागलेले पोषण आहार पुरवणाऱ्या कंत्राटदाराला काढून टाकण्याची मागणी केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com