School closed : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! येत्या २५ सप्टेंबरला सर्व शाळा राहणार बंद; नेमकं कारण काय?

School closed 25 September 2024 : विद्यार्थी तसेच पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. राज्यातील सर्व शाळा येत्या २५ सप्टेंबर रोजी बंद राहणार आहे.

विद्यार्थी तसेच पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. राज्यातील सर्व शाळा येत्या २५ सप्टेंबर रोजी बंद राहणार आहे. राज्यभरातील प्राथामिक शाळा शिक्षक आंदोलन करणार आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक संच मान्यतेचा १५ मार्च २०२४ मध्ये आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय ५ सप्टेंबर २०२४ रोजी काढण्यात आला होता.

सरकारने काढलेले हे दोन्ही शासन निर्णय वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहेत. त्यामुळे ते तातडीने रद्द करण्यात यावे, अशी मागणी प्राथामिक शाळेतील शिक्षकांनी केली आहे. यासाठी शिक्षकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे.

येत्या २५ सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी ठिकठिकाणी आंदोलने देखील होणार आहे. त्यामुळे यादिवशी शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे येथे नुकत्याच झालेल्या शिक्षण संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com