Hiraman Khoskar : इगतपुरीत कॉंग्रेसला धक्का; हिरामन खोसकरांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी

Igatpuri Constituency : विधानसभा निवडणुकीचं बीगुल वाजताच इगतपुरीतून कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

हिरामन खोसकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. देवगिरी बंगल्यावर मंगळवारी अजित पावर यांच्या उपस्थितीत खोसकरांनी हा प्रवेश केला आहे.

कॉंग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटात आज पक्ष प्रवेश केला. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर हा पक्ष प्रवेश झाला आहे. त्यामुळ इगतपुरीत कॉंग्रेसला एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. विधानपरिषदेत हिरामन खोसकर यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला होता. त्यामुळे खोसकर नाराज होते. त्यानंतर आज त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे आता कॉंग्रेससाठी हा धक्का असून विधानसभेत कॉंग्रेस काय भूमिका घेईल हे पाहाणं महत्वाचं ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com