Housing Society New Rule: Special Report: दोनपेक्षा अधिक अपत्य? संचालकपदाला चाप

गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांसाठी महत्वपूर्ण बातमी आहे. दोन पेक्षा अधिक मुलं असलेल्या सदस्यांचे धाबे दणाणले आहे. त्यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. काय आहे उच्च न्यायालयाचा निकाल? पाहूया या रिपोर्टमधून...

Housing Society Special Report: सर्वच शहरांमध्ये गृहनिर्माण संस्थांचं जाळ आहे. सहकार विभागाचे नियम काही ठिकाणी काटेकोरपणे पाळले जातात तर कुठे नियम धाब्यावर बसवले जातात. मात्र उच्च न्यायालयाचा एक निकाल सर्वांसाठी महत्वाचा आहे. दोनपेक्षा जास्त अपत्य असलेली व्यक्ती गृहनिर्माण संस्थेची संचालक मंडळाचा सदस्य होऊ शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिला आहे. कांदिवली एकता नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य पवनकुमार सिंग यांना म्हाडाच्या उपनिबंधकांनी अपात्र ठरवले होते. हा निर्णय विभागीय सहनिबंधकांनी कायम ठेवला होता. या आदेशाला सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांची याचिका फेटाळताना हायकोर्टानं हा महत्वाचा निर्णय दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com