Mahayuti Meeting In Delhi : जागावाटपावर दिल्लीत अंतिम बैठक; मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना

Mahayuti Seat Sharing Formula : जागावाटपासंदर्भात महायुतीकडून आज अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे.

महायुतीच्या जागावाटपासंदर्भात आज दिल्लीत अंतिम निर्णय होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे थोड्या वेळात दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीत खलबत सुरू असून जागावाटपाच्या मुद्द्यावर तिढा सोडवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न सध्या सुरू आहेत. त्याच संदर्भात आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक आज पार पडणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत जाणार आहेत. अमित शहा यांच्याशी आज अंतिम चर्चा होणार असून जागावाटपाचं सूत्र आज ठरवलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील तिन्ही प्रमुख मंत्र्यांशी ही भेट होत असल्याने या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com