Hitendra Thakur : पत्रकार परिषद घेऊ नका, असं कोणत्या कायद्यात आहे? हितेंद्र ठाकूर यांचा सवाल, VIDEO

Hitendra Thakur News : निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बंद करायला सांगितल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी आक्रमक प्रतक्रिया दिली.

विरार : विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांना घेरलं. या संपूर्ण प्रकारानंतर हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंवर गंभीर आरोप केले. ही परिषद घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना बंद करण्यास सांगितली. यावरून हितेंद्र ठाकूर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'पत्रकार परिषद घेऊ नका. असं कोणत्या कायदा आणि नियमात आहे. मी कुणाच्या बापाचं प्रेशर घेत नाही. वेगवेगळ्या रुममध्ये पैसे मिळाले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांना विचारा. मला सुरक्षा दल आणि कुणाला जुमानत नाही. पण पोलीस आणि निवडणूक आयोगावर दबाव आहे. विनोद तावडे येथे थांबले कसे? असा सवाल हितेंद्र ठाकूर यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com