High Court News : 'याला एन्काऊंटर म्हणता येणार नाही'; कोर्टाने ओढले ताशेरे

Akshay Shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी आक्षेप घेत अक्षयच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली.

आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी आक्षेप घेत अक्षयच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने याला एन्काऊंटर म्हणता येणार नाही, असं म्हंटल आहे.

जस्टिस ढेरे आणि चव्हाण यांच्या समोर झालेल्या सूनवणीतून अनेक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांनी एन्काऊंटर केला त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा सीआयडीकडे गेला पण अजून कागद दिलेले नाहीत. याबद्दल कोर्टाकडून विचारना करण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान हायकोर्टाने पोलिसांवर चांगलेच ताशेरे ओढले. 'चार पोलिस असताना आरोपी कसा काय आक्रमक होऊ शकला?', असा सवाल कोर्टाने उपस्थित केला. तसंच, 'पिस्तूल चालवायला ताकद लागते. साधा माणूस ते चालवू शकत नाही. याला एन्काऊंटर म्हणू शकत नाही. तातडीने अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेज सादर करा.', असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले. तसेच कोर्टाने फिंगर प्रिंट एक्स्पर्टकडून माहिती मागवली आहे. एन्काऊंटर केलेल्या व्हॅनची माहिती घेतली असून सहभागी 5 पोलिसांचे सीडीआर घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com