VIDEO: मुसळधार पावसाचा हाहा:कार; कोल्हापूर सांगलीला पुराचा धोका

Heavy Rain In Kolhapur And Sangli District: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुराचा धोका निर्माण झालाय.

मुंबई : गेली आठ दिवस कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीय.दरम्यान प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. पुराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरूवात देखील केलीय.

करवीर तालुक्यातील आंबेवाडी, चिखली वरणगे, शिंगणापूर हनुमंतवाडी या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जोरदार पाऊस पडत असल्याने या गावातील नागरिकांना सतर्क करण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याचं समोर आलंय. तर घरांमध्ये देखील पाणी शिरल्याचं समोर आलेलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com