VIDEO : सुप्रिया सूळेंच्या विजयाबाबत हर्षवर्धन पाटलांचं मोठं विधान

Harshwardhan Patil Speaks About Supriya Sule : भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयबद्दल मोठं विधान केलं आहे.

'खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयात आपलाही अदृश्य हात असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हंटलं आहे. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आमदार हर्षवर्धन पाटील यांनी अखेर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्या नंतर उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

'सुप्रिया सुळे आमच्या भगिनी आहेत. सुप्रिया सुळे चारवेळा खासदार झाल्या. याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांना तीनवेळा खासदार करण्यात आमचा प्रत्यक्ष सहभाग होता. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आमचा सहभाग हा अदृश्य स्वरुपाचा होता'', असं विधान हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज त्यांनी इंदापूर येथे आयोजित एका दिमाखदार कार्यक्रमात शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यामुळे पवारांच्या पक्षाची ताकद कैकपटीने वाढली असून, भाजपला मोठे भगदाड पडले आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानाची मात्र आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com