मनोज जरांगे पाटील चौथी पास झालेत का? गुणरत्न सदावर्तेंचा रॅपमधून हल्लाबोल, VIDEO

Gunaratna Sadavarte Rap Attack On Jarange Patil: मराठा आरक्षणावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्न उपस्थित करत सरकारच्या अध्यादेशावर तीव्र टीका केली आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नी आता नवे वादंग निर्माण झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सरकारकडून यश मिळाल्यानंतर हैद्राबाद गॅझेटीयरनुसार अध्यादेश काढण्यात आला. मात्र, या निर्णयामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले असून राज्यभरात नवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हैद्राबाद गॅझेटीयरनुसार कोणीही मागासवर्गीय ठरत नाही," असे मत व्यक्त करत त्यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इतकंच नव्हे तर, सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर एक रॅप सादर करून तीव्र टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com