VIDEO: "पुढील ९० दिवसांत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार", पालकमंत्री Abdul Sattar यांचा वादा!
मुंबई: छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार शहरात दाखल झाले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत केलं. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मी अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. या जिल्ह्यात असताना पाचवेळा मंत्रिपद मिळालं, पण पालकमंत्री पद मिळालं नव्हतं. आज मी छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री आहे. यापूर्वी झालेले पालकमंत्री औरंगाबादचे पालकमंत्री होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मला ही संधी दिलीय. कमी ओव्हर आहेत, पण या कमी ओव्हरमध्ये शहराचे, जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे. शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पुढील ९० दिवसांत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. सर्वांशी विचार विनिमय करूनच निर्णय घेण्यात आलाय. भाजप आणि शिवसेना आमदार यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.