‘सागरा प्राण तळमळला’, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या भव्य पुतळ्याचे अंदमानमध्ये अनावरण|VIDEO

Grand Unveiling Of Veer Savarkar Statue In Andaman: अंदमानच्या पोर्ट ब्लेअर येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे मोहन भागवत, अमित शाह आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमान येथे रचलेल्या सागरा प्राण तळमळला या अजरामर गीताला 116 वर्षे झाली असून या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून आज 12 डिसेंबर रोजी पोर्ट ब्लेअर येथे सागरा प्राण तळमळला या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच या कार्यक्रमाचे निमित्ताने अंदमानात सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण पार पडले. अंदमानच्या कारागृहातच सावरकर यांना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली होती. नंतर त्यांना सोडून देण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com