Gold News 2024 : आजच सोने खरेदी करा! वर्षाच्या अखेरीस सोनं 1 लाख रुपये तोळा होणार?
मुंबई : २०२४ अखेरपर्यंत एक सोनं तोळं हे एक लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असा अंदाज काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. वाढत्या जागतिक मंदीमुळे सोन्याचे भाव वधारण्याची शक्यता आहे. वाढता वापर पाहता चांदीही यावर्षी लाखांच्या पार जाण्याची शक्यता आहे.
सोने लाखांच्या पार जाण्याचे कारणे काय?
जगभरातील लोकांचा डॉलरऐवजी सोनं खरेदीवर भर पाहायला मिळत आहे. अर्थव्यवस्थेसाठी मजबुतीसाठी चीन, रशियाकडून सोनं खरेदी केलं जात आहे. वाढत्या जागतिक मंदीमुळे सोन्याला तेजी आली आहे. भारताचाही सोन्याचा साठा वाढवण्यावर भर आहे. लवकरच भारताचा सोनं साठा १ हजार टनांवर जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.