Gold Rate : तब्बल १०४ टन सोनं भारतात आलं, भारतातील सोन्याच्या किंमती कमी होणार? वाचा

gold rate today India latest update 2026 : आरबीआयने परदेशातून १०४ टन सोने भारतात आणल्यामुळे सोन्याचे दर कमी होणार का याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजार आणि डॉलरच्या स्थितीवर अवलंबून राहणार आहेत.

Gold Rate news Update : मागील काही दिवसांपासून आखाती देशात अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव सुरू आहे, त्याचा परिणाम जगभरात पडलाय. इंधनासोबतच सोन्याच्या किंमतीमध्येही मोठी वाढ झाली आहे. देशांतर्गत मार्केटमध्ये अस्थिरता असल्याने सोन्याच्या दरात काही दिवसांपासून चढउतार सुरू आहे. मागील काही दिवसांत सोन्याच्या किंमती प्रति तोळा दीड लाखांच्या पार गेल्या आहेत. पण आता या किंमती घसरण्याची शक्यता आहे. कारण, आरबीआयने देशात तब्बल १०४ टन सोनं आणलं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परदेशातील बँकांमध्ये साठवून ठेवलेले 104 टन सोने सुरक्षितपणे भारतात परत आणलंय. या मोठ्या हालचालीमुळे देशात सोन्याचे भाव कमी होणार का, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू झालीय. मात्र, हा केवळ तांत्रिक बदल असून सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि डॉलरच्या स्थितीवरच अवलंबून असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com