Maharashtra Politics : खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर महाजनांचा सवाल

Eknath Khadse And Girish Mahajan खडसे यांच्या भाजप प्रवेशाचे पुरावे आहेत का? असा सवाल गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या वक्तव्यावर उपस्थित केला आहे.

एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाचे पुरावे आहेत का? असा सवाल गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या वक्तव्यावर उपस्थित केला आहे.

एकनाथ खडसे यांनी आपला भाजपमध्ये प्रवेश झाला आहे असा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर आता महाजन यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाला आहे, याचे काही पुरावे आहेत का? असं महाजन यांनी म्हंटले आहे. या आधीसुद्धा एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद दिसून आले आहेत. हा वाद सर्वश्रुत आहे. आता पुन्हा एकदा महाजन यांनी खंडसेंच्या पक्ष प्रवेशावर प्रश्न उपस्थित करून वादाला तोंड फोडले आहे. ' आमच्याकडे दुटप्पी भूमिका चालत नाही. अमित शहा यांनी माझ्या पक्ष प्रवेश मान्य केला आहे. जे. पी. नड्डा यांनी माझ्या गळ्यात शाल टाकली असे जर खडसे म्हणतात तर याचा काही पुरावा आहे का?' असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com