Assembly Election : ऑक्टोबरमध्ये विधानसभा?; गिरीश महाजनांचं मोठं विधान

Girish Mahajan : राज्यातल्या विधानसभा निवडणुकांवर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात विधानसभा निवडणुकांच्या चर्चा रंगायला लागल्या आहेत.

राज्यातल्या विधानसभा निवडणुकांवर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या 15-20 दिवसांत राज्यात आचारसंहिता लागेल असं विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे. त्यामुळं आता ऑक्टोबरच्या सुरुवातीला विधानसभा निवडणूका जाहीर होतील का? याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात विधानसभा निवडणूक कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सगळ्या पक्षांनी विधानसभेच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. जागा वाटपवर देखील खलबतं सुरू असतानाच आता मंत्री गिरीश महाजन यांनी लवकरच आचारसंहिता लागणार असल्याचं मोठं विधान केलं आहे. पुढच्या 15 ते 20 दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू होईल असं महाजन यांनी म्हंटल आहे. त्यामुळं ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गिरीश महाजन यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात विधानसभा निवडणुकांच्या चर्चा रंगायला लागल्या आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com