तीन तास व्यायाम, उपाशी ठेवलं, गर्भपात अन्...; नोरासारखी फिगर पाहिजे म्हणून पतीकडून पत्नीचा अमानुष छळ|VIDEO

Husband Forces Wife For Nora Fatehi-Like Body Figure: गाझियाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नोरासारखी फिगर हवी म्हणून पतीने पत्नीला तीन-तीन तास व्यायामाला भाग पाडले, उपाशी ठेवले आणि गर्भपातही केला.

अभिनेत्री म्हंटल की तिच्या सौंदर्य बघून तिच्या अनेक चाहत्यांना भुरळ पडते. योग्य आहार आणि व्यायामामुळे अभिनेत्री आपली फिगर बनवत असतात. अशाच एका अभिनेत्रीच्या फाजील मोहाचा एक गंभीर प्रकार उघडकीस झाला आहे. उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद येथील मुरादनगर येथील रहिवासी असलेल्या महिलेसोबत हा गंभीर प्रकार घडला आहे. या महिलेच्या पतीला नोरा फतेही या अभिनेत्रीची फिगर आवडायची. म्हणून आपली पत्नीचे शरीर नोरासारखेच असायला पाहिजे म्हणून त्याने पीडित महिलेला सलग तीन तास जीममध्ये व्यायाम करायला भाग पाडले.

या महिलेचा पती हा जीम ट्रेनर आहे. या महिलेची उंची आणि सौंदर्य एका सामान्य महिलेप्रमाणे आहे. पण ही बाब तिच्या पतीला आवडली नाही. याच कारणामुळे पती पीडित महिलेला सतत त्रास द्यायचा, टोमणे मारायचा तसेच ,मी चुकीच्या मुलीसोबत लग्न केले आहे असे म्हणून पीडित महिलेला छळायचा. तसेच पत्नीला रोज तीन ते चार तास व्यायाम करायला लावायचा आणि तिचा गर्भपात देखील केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. अभिनेत्रीच्या फिगरच्या मोहापाई आरोपी पतीने आपल्या पत्नीला त्रास दिल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून कडक कारवाई कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com