माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या अडचणीत वाढ; 20 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी|VIDEO

Former Vasai-Virar Commissioner: वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि निलंबित नगर रचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांना ईडीने लाचखोरी प्रकरणात अटक करून 20 ऑगस्टपर्यंत कोठडी दिली आहे.
Summary

माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि निलंबित अधिकारी वाय. एस. रेड्डी यांना ईडीने अटक केली.

अनधिकृत बांधकाम लाच प्रकरणात गंभीर आरोप.

कारवाईत 1 कोटी 33 लाखांची रोकड आणि प्रॉपर्टी डॉ़क्युमेंट्स जप्त.

न्यायालयाने 20 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी मंजूर केली.

वसई-विरार : वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि निलंबित नगर रचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांना सक्तवसुली संचालयाने (ED) आज अटक केली आहे. अनधिकृत बांधकामातून प्रति चौरस फुट 20 ते 25 रुपये लाच घेतल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.

29 जुलै रोजी ईडीने पवार यांच्या शासकीय निवासस्थानी तसेच मुंबई, पुणे, नाशिक आणि सटाणा येथे एकूण १२ ठिकाणी धाड टाकली होती. या कारवाईत 1 कोटी 33 लाखांची रोकड, मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, हार्डडिस्क, नातेवाईक व बेनामी व्यक्तींच्या नावावरची प्रॉपर्टी डॉ़क्युमेंट्स, कॅश-चेक स्लिप्स आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली होती.

आज न्यायालयात सुनावणीदरम्यान ईडीने दोन्ही अनिलकुमार पवार यांना 20 ऑगस्टपर्यंत कोठडी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com