Ghatkopar Hoarding News | घाटकोपरमध्ये दुर्घटनास्थळी पेट्रोल पंपाला आग, बचाव कार्य सुरू

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून अपघात झाला होता. त्याचे बचावकार्य सुरू असताना आग लागली आहे. या आगीत कुठलीही हानी झालेली नाही अशी प्राथमिक माहिती आहे. स्पार्क प्लगमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून अपघात झाला होता. त्याचे बचावकार्य सुरू असताना आग लागली आहे. या आगीत कुठलीही हानी झालेली नाही अशी प्राथमिक माहिती आहे. स्पार्क प्लगमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. आगीची माहिती मिळताच ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. होर्डिंग कोसळल्यानंतर अजूनही काही लोक खाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या अपघातात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून ७८ जण जखमी झाले आहेत. भावेश भिंडे याच्या मालकीचा हा होर्डिंग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सध्या भावेश फरार आहे आणि पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com