Hingoli Rain : पिकं भुईसपाट; शेतात वाळूचे मोठमोठे थर, हिंगोलीत महापुराची भयानक दृश्य VIDEO

Farmers Loss due to flood in Hingoli Heavy Rain : हिंगोलीत महापुराने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. शेतात माती साचल्याचं समोर आलंय.

मुंबई : हिंगोलीत पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पुरामुळे शेतातील काळी सुपीक माती वाहून गेलीय, नदीमधील वाळूचे मोठमोठे थर शेतात जमा झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आता मोठं संकट निर्माण झाल्याचं दिसतंय. हिंगोलीत महापुरामुळे दाणादाण उडालीय. शेतात मोठमोठे दगडं देखील पुराच्या प्रवाहाने वाहून आले आहेत. उभं पीक भुईसपाट झालंय, संपूर्ण शेतात वाळूचं साम्राज्य पसरलेलं आहे. त्यामुळे खायचं काय आणि जगायचं कसं? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय.

मराठवाड्यात १ आणि २ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाला. अवघ्या ७२ तासांत १४५ मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. या महापुरामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय. कापूस, सोयाबीन पिकांचं नुकसान झालंय. विहिर देखील बुजून गेलीय. त्यामुळे सरकारने पंचनाम्यांची वाट न पाहता तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com