Sangli Fake IT Raid: सांगलीत स्पेशल 26 स्टाईल लूट! बनावट आयकर अधिकाऱ्यांची डॉक्टरच्या घरावर धाड; कोट्यावधी रुपये लंपास|VIDEO

Kavthemahankal Incident: सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे धक्कादायक घटना घडली. बनावट आयकर अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर छापा टाकून कोट्यवधींचे सोने व रोकड लुटून नेले.

अक्षय कुमारच्या स्पेशल 26 च्या चित्रपटाप्रमाणे सांगलीतल्या कवठेमहांकाळमध्ये एका डॉक्टरच्या घरावर आयकर छापा टाकत कोट्यवधीचे सोने आणि रोकड लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आयकर विभागाकडून आल्याचा सांगत शहरातील प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरात बोगस आयकर पथकाने रविवारी रात्रीच्या सुमारास प्रवेश केला. डॉक्टर म्हेत्रे यांना सर्च वॉरंट दाखवत चौघांनी सिने स्टाईल पद्धतीने घराची झडती घेतली, ज्यामध्ये घरात असणारी 16 लाखांची रोकड तब्बल एक किलोच्या आसपास सोन्याचे दागिने असे जवळपास 2 कोटींचे जप्त केल्याचे सांगत तेथून पोबार केला, त्यानंतर डॉक्टरांना संशय आल्याने डॉक्टरांनी कवठेमहांकाळ पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांच्या घरी धाव घेत, छापा बोगस सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला आहे .मात्र तोतया आयकर विभागाच्या धाडीमुळे सांगली जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com