Sangli Helicopter Emergency Landing | हेलिकॉप्टरचं ईमरजन्सी लँण्डिंग...

आत्ताची सर्वात मोठी बातमी! सांगलीच्या एरंडोलीमध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. कालच महाडमध्ये एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता, ते क्रॅश झालं होतं.

Sangli Helicopter Emergency Landing | आत्ताची सर्वात मोठी बातमी! सांगलीच्या एरंडोलीमध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. कालच महाडमध्ये एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता, ते क्रॅश झालं होतं. सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसणार होत्या परंतु हा अपघात टळला आणि आता सांगली मधली ही घटना आहे सांगलीच्या एरंडोली येथे सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मिरज तालुक्यातल्या एरंडोलीमध्ये हे लँडिंग करण्यात आलंय. हे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे एका शेतात लँड झालंय अशी माहिती मिळतेय. दरम्यान हे हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांची गर्दी झालीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com