Rajya Sabha By Election 2024 : मोठी बातमी! महाराष्ट्रातील २ राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार, VIDEO

Rajya Sabha by election update : महाराष्ट्रातील २ राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

नवी दिल्ली : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. महाराष्ट्राच्या दोन राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. उदयनराजे भोसले आणि पियूष गोयल यांच्या जागी पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक ३ सप्टेंबर रोजी होणार आहे. राज्यसभेच्या १२ जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. त्यात महाराष्ट्राच्या दोन जागांचाही समावेश आहे. उदयनराजे भोसले आणि पियूष गोयल यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाला. त्यानंतर त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली. आता या दोन्ही रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com