Eknath Shinde: हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांना ठेचून काढलं पाहिजे; एकनाथ शिंदे संतापले|VIDEO

After Vaishnavi Hagwane’s Death, Eknath Shinde Warns Dowry Abusers: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुंड्यासाठी आपल्या सुनेचा छळ करणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राज्यातच नव्हे तर देशभरात सध्या हुंडा घेण्याच्या घडणा वाढताना दिसत आहे. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थानी आज मोठा सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील तरुणींना आवाहन करत म्हणाले, राज्यात सुनांवर अत्याचार होण्याच्या घटना दिसत आहे. तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या लेकी आहात अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण तुम्हाला मिळाली आहे. फुटकळ लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव द्यावा एवढा तुमचा जीव स्वस्त नाही त्यामुळे हुंड्यासाठी छळ करणाऱ्या लोकांना ठेचून काढले पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com