मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Eknath Shinde Helicopter Emergency Landing In Mumbai: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला वादळी हवामानाचा फटका बसल्याने हवेतच अडचण निर्माण झाली. मात्र वैमानिकाच्या कौशल्यामुळे हेलिकॉप्टरची जुहू विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली.

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला आज खराब हवामानाचा मोठा फटका बसला. महालक्ष्मी येथून साताऱ्यातील आपल्या 'दरे' या गावी जात असताना, कल्याण आणि मुरबाड परिसरातील वादळी वारे आणि पावसामुळे त्यांचे विमान हवेतच अडकले होते. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर सुरक्षितपणे जुहू विमानतळावर उतरवल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पीए (PA) आणि ओएसडी (OSD) यांच्यासह महालक्ष्मी येथून हेलिकॉप्टरने साताऱ्याकडे निघाले होते. हेलिकॉप्टर कल्याण-मुरबाड पट्ट्यात पोहोचले असता, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे विमानावरचे नियंत्रण राखणे कठीण झाले. खराब वादळी वाऱ्याचा अंदाज लक्षात घेऊन पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेला वळवले आणि जुहू येथे यशस्वी इमर्जन्सी लँडिंग केले. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही माहिती समजताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com