Anjali Damania: एकनाथ शिंदे विरोधी पक्षात? अंजली दमानियांनी व्यक्त केली शंका

Eknath Shinde News : एकनाथ शिंदे विरोधीपक्षनेते होतील, असा संशय अंजली दमानिया यांनी व्यक्त केलाय. ही भाजपचीच स्क्रीप्ट असल्याचेही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय. दमानिया यांच्या ट्वीटमध्ये नव्या राजकीय समिकरणाची चर्चा होत आहे.

Eknath Shinde as Leader of Opposition? अंजली दमानियांनी यांच्या ट्वीटमुळे महाराष्ट्रात नव्या चर्चेला उधाण आले आहे. अंजली दमानियांनी यांनी एकनाथ शिंदे विरोधी पक्षात जातील, अशी शंका व्यक्त केली आहे.

विरोधी पक्षच संपवण्याचा भाजपचाच कट आहे. सत्ता पण आमचीच आणि विरोधी पक्ष पण आमचाच. बाकी पक्ष / विरोधी पक्ष नेतातच अस्तित्वात ठेवायचे नाहीत. गावी जाणे, ताप येणे, पुन्हा घरी येणे, पुन्हा बरं न वाटणे ही भाजपची स्क्रीप्ट असल्याचा आरोप अंजली तमानिया यांनी ट्वीट करत म्हटलेय.

अंजली दमानिया यांचं ट्वीट काय ?

परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद संगात होते. ४ दिवसांपूर्वी PC घेऊन भाजपला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले, दाल मे कूछ काला है. ते पत्रकार मला म्हणाले की भाजपचीच रणनीती असेल की ह्यांना विरोधी पक्षात बसवावे, त्यांना हवे नको ते सगळे पुरवले जाईल आणि विरोधी पक्ष नेता पण ह्यांचाच . बाकी सगळे साफ . तसेच होतांना दिसतंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com