मोठी बातमी! एकनाथ खडसेंवर अटकेची टांगती तलवार, राजकीय वर्तुळात खळबळ

Eknath Khadse Arrested In Bhosari Land Scam: पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे न्यायालयात अनुपस्थित राहिल्यामुळे जामिन पात्र वॉरंट जारी झाला.

राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात सत्र न्यायालयाने आजामीनपात्र वारंट जारी केले आहे. शुक्रवारी झालेल्या या प्रकरणाच्या सुनावणीसाठी गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. याआधी विशेष पीएमएलए न्यायालयाने एकनाथ खडसे यांनी दाखल केलेला दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला आहे.

त्यामुळे खडसे कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत.पुणे येथील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची काल नायालयात सुनावणी होती. मात्र या सुनावणीला ते हजर राहू शकले नसल्याने, न्यायालयाने त्यांच्या विरोधात जामीन पात्र वॉरंट जारी केल्याने खळबळ उडाली होती. या संदर्भात आमचे प्रतिनिधी दीपक चौधरी यानी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. आपली प्रकृती ठीक नसल्याने आपण न्यायालयात सुनावणी साठी हजर राहू शकलो नाही. आपली प्रकृती ठीक नसल्याने आणि हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने आपण कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com