Video: माझा अनौपचारीक भाजप प्रवेश झाला! शाहांच्या भेटीनंतर Eknath Khadse यांची पहिली प्रतिक्रिया 'साम'वर EXCLUSIVE

Eknath Khadse Breaking News: भाजपात अनौपचारीक प्रवेश झाल्याची खडसेंची माहिती, अमित शाह यांच्या भेटीनंतर मोठी प्रतिक्रिया

मुंबई : एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलंय. माझा अनोपचारीकपणे भाजपमध्ये प्रवेश झाला असल्याचं खडसेंनी म्हटलंय. साम टीव्हीला सगळ्यात आधी पहिली प्रतिक्रिया देताना खडसेंनी अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीवर महत्त्वाचं वक्तव्य केलं. रक्षा खडसे यांच्यासोबत अमित शाह यांची भेट घेतल्याचं खडसे यांनी म्हटलं. दरम्यान, आपला भाजपमध्ये अनौपचारीक प्रवेश झाला आहे, असंही ते म्हणाले. भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या खडसेंनी लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी वेगळी भूमिका घेतली होती. भाजपकडून एकनाथ खडसे यांची सून रक्ष खडसे यांना रावेरमधून उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर खडसेंनी भाजपसोबत जवळीक साधल्याचंही स्पष्ट केलं होतं. दरम्यान, आता भाजपप्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम लावत आपला अनौपचारीकपणे भाजप प्रवेश झाल्याचंही सांगितलं जातंय. रक्षा खडसे यांना मंत्रिपद मिळालं, यासाठी आपण अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली, असं खडसेंनी म्हटलंय. दरम्यान, त्याव्यतिरीक्त कोणतीही चर्चा न झाल्याचंही खडसेंनी म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com