नीट पेपरफुटी प्रकरणानंतर इंटिग्रेटेड कॉलेज (कोचिंग क्लास आणि महाविद्यालये टायअप) व्यवस्थेवर शिक्षण विभागाने कारवाईची प्रक्रिया सुरू केलीय. पुणे विभागातील पुणे, सोलापूरसह अहिल्यानगर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांची विशेष पडताळणी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. आपापल्या स्तरावर भरारी पथके नियुक्त करावीत, अशाही सूचना आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती, बायोमेट्रिक हजेरी आणि महाविद्यालयांच्या कार्यपद्धतीची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेत.
इंटिग्रेटेड महाविद्यालयांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या अनियमिततेकडे 'साम टीव्ही'ने लक्ष वेधले होते. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसच्या नेटवर्कची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आणि विशेष परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
डॉ. मोरे यांनी प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार कनिष्ठ महाविद्यालयांची मूळ मान्यता, संस्थेची नोंदणी व मान्यतासंबंधी कागदपत्रे, विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती, नियमित हजेरी नोंदी, जनरल रजिस्टर, भौतिक सुविधा तसेच क्लासेस-महाविद्यालय टायअपची कार्यपद्धती यांची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय विद्यार्थी, पालक किंवा इतरांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधितांवर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे युवासेना राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.