नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला मोठं वळण लागलं असून आता अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील एंट्री झाली आहे. हे EDचं पथक नाशिकमध्ये दाखल झालं असून त्यांनी थेट पोलीस अकादमी गाठली आहे. याच ठिकाणी सध्या SIT कडून अशोक खरात याची सखोल चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, EDने खरातविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता खरातच्या मालमत्तांची चौकशी करण्यावर भर दिला जात आहे. त्याच्या नावावर असलेल्या मालमत्तांचे कागदपत्र EDकडून तपासले जाणार आहेत.
तपास यंत्रणांकडून आधीच खरातच्या मालमत्तांचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून त्या आधारे पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.