Firecracker Safety Guide: फटाके फोडताना काळजी घ्या! डॉ. अनुपम टाकळकर यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना|VIDEO

Celebrate a Safe Diwali: दिवाळी सण आनंदाचा असला तरी फटाके फोडताना सुरक्षितता महत्त्वाची आहे. डॉ. अनुपम टाकळकर यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने नागरिकांना फटाके फोडताना घ्यावयाच्या काळजीविषयी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने जनहितार्थ प्रसारित

दिवाळी सण आनंदाचा आहे. पण फटाके फोडताना सुरक्षितता राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने खालील सूचना दिल्या जात आहेत.

1. लहान मुलांना फटाके एकट्याने फोडू देऊ नका. त्यांच्या सोबत मोठ्या व्यक्तीने उपस्थित राहावे.

2. अनार, रॉकेट यांसारखे फटाके हातात धरून उडवू नयेत. असे प्रकार अपघातास कारणीभूत ठरतात.

3. फटाके फोडताना जवळ पाण्याची बादली आणि मग ठेवा. अपघात झाल्यास तात्काळ वापर करता येईल.

4. फटाके साठवलेल्या ठिकाणी पेटती अगरबत्ती, मेणबत्ती किंवा दिवा नेऊ नका.

5. फटाके फोडताना पायात बंद बूट आणि डोळ्यांवर सुरक्षात्मक चष्मा वापरा.

6. सैल, ढगळ किंवा नायलॉनचे कपडे वापरणे टाळा. सूती कपडे अधिक सुरक्षित असतात.

7. फटाके मोकळ्या आणि सुरक्षित जागेत, शक्यतो पटांगणात फोडा.

8. अनार पेटवताना त्यावर वाकू नका. ठिणगी उडून इजा होऊ शकते.

9. रॉकेट, शीट्टीसारखे फटाके उडवताना विशेष काळजी घ्या. त्यासाठी मोकळी जागा निवडा.

10. अती आवाजाचे फटाके, सुतळी बॉम्ब टाळा. त्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि अपघात होऊ शकत

11. न फुटलेले फटाके पुन्हा पेटवू नका. दुसऱ्या दिवशी त्यांची दारू एकत्र करून जाळणे टाळा.

भाजल्यास काय करावे

1. भाजलेला भाग दहा ते पंधरा मिनिटे नळाच्या पाण्याखाली ठेवा.

2. भाजलेल्या जागेवर सिल्वरेक्स क्रीम लावा.

3. घरगुती उपाय करण्याऐवजी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

4. कोलगेट, तेल, आयोडेक्स किंवा अप्रमाणित उपचार टाळा. त्यामुळे संसर्ग होऊ शकतो.

5. डोळ्यांना इजा झाल्यास स्वच्छ पाण्याने धुवा. डोळे चोळू नका आणि तात्काळ नेत्ररोग तज्ञांना दाखवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com