पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची सखोल तपासणी सुरू केली आहे. रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर अभिजित लोढा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता. शारीरिक परिश्रमामुळे त्यांना काहीसा थकवाही जाणवत होता. खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या शरद पवार हे खासगी रूममध्ये असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेले नाही. डॉक्टरांकडून आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून त्यांचे अहवाल पुढील दोन ते तीन तासांत प्राप्त होतील, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबत कुठलीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.