Disha Salian Case : आता सगळं बाहेर येणार, आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, राणेंची मागणी, राजकारण तापणार|VIDEO

Disha Salian Case News Update : दिशाने आत्महत्या केली नसून तिचा बलात्कार करून हत्या झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Nitesh Rane On Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य टाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. त्याशिवा दिशा सालियन प्रकरणाची पुन्हा सुरुवात झाली असून पुढे काय घडतं ते पाहा, असा इशारा त्यांनी दिला आहे. या आरोपांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. दिशाने आत्महत्या केली नसून तिचा बलात्कार करून हत्या झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दिशा सालियन हिच्या आई-वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून याचिका दाखल केली आहे. दिशा सालियन प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी, माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही, असे वडिलांनी म्हटले आहे. दिशा सालियन प्रकरण आदित्य ठाकरे आणि सूरज पांचोली यांचे नाव घेण्यात आलेय. त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, असेही सालियन यांच्या वकिलाने म्हटले आहे. राणे यांच्या आरोपात तथ्य असल्याचा दावा वकिलाने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com